साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 मे 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर येथील वॉर्ड क्र ७ मधील दिनेश स्कूटर परिसरात नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाहेरगावहून आलेल्या 2 व्यक्तींना होम क्कायरटाईन करण्यात आले.
वडाळा महादेव येथे इंडियन ऑइल पाईपलाईन च्या कामाला जिल्हाधीकाऱ्यांनी आज पासून परवानगी दिली. त्याचे कार्याध्यक्ष श्रीरामपूर येथील दिनेश स्कूटर जवळ आहे काल येवला व निफाड येथून दोन कर्मचारी अचानक विनापरवानगी कार्यालयात मुक्कामी आले. पत्रकार नरेश सिकची, सुमीत सचदेव, सुरज सोमाणी यांनी त्यांचेकडून माहिती घेतली असता, त्यांना सदर प्रकार लक्षात आला. पत्रकार सिकची यांनी पो. नि.बहिरट, तालुका अधिकारी मोहन शिंदे यांना संपर्क साधून त्वरीत कार्यवाहीची मागणी केली. तालुका आरोग्य अधिकारी शिंदे, डॉ संकेत मुंदडा, डॉ सचिन पऱ्हे यांनी दोघांची वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघांना होम क्वारंटाईन केले.