Shrirampur : कचरा ठेक्यात कामगारांना पुढे करून लाजिरवाणे राजकारण ; अक्षय वर्पे


साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मे 2020
श्रीरामपूर | नगरपालिका घन कचरा ठेक्याचे दर वाढविण्याचा डाव स्वाभिमानी २३ नगरसेवकांनी हाणून पाडल्याने, काही लोक कामगारांच्या नावाखाली लाजिरवाणे राजकारण करत असल्याचा टोला घन कचरा वाढीव रकमेला सर्वप्रथम विरोध करणारे भाजपा युवा मोर्चाचे  अक्षय वर्पे यांनी लावला आहे.


        घन कचरा ठेक्याच्या वाढलेल्या रकमेचा व कर्मचाऱ्यांचा पगार वाढविणे या गोष्टीचा संबंध जोडणे अत्यंत हास्यास्पद आहे. कारण ठेका वाढविण्याच्या रकमेत कुठेही कर्मचाऱ्यांचा पगार वाढविणे हा उल्लेख करण्यात आलेला नाही. कर्मचाऱ्यांचा जर काहींना कळवळा असेल तर त्यांनी तसा उल्लेख का केला नाही ? नगराध्यक्षा व सत्ताधारी गटातील १२ नगरसेवकांनी देखील निगोसीयशन म्हणजे ठेक्याची रक्कम कमी करावी या पर्यायावर सही केली आहे याचा अर्थ त्यांनाही कर्मचाऱ्यांचे वाढीव पगार नकोय का ? घन कचरा ठेक्यात काम घेणारी एजन्सी स्वतः काम करणार आहे का ? की त्या एजन्सीच्या नावाखाली दुसरे कोणी काम करणार आहे हे स्पष्ट व्हायला हवे. कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यास श्रीरामपूर भाजप व सगळे नगरसेवक अनुकूल आहेत त्यात शंका असण्याचे कारण नाही. मुळात जर सध्याचा ठेकेदार २३ लाख रुपयांच्या ठेक्यात १४ घंटागाडी व ८ ट्रॅक्टरचे पेमेंट करतो तर नवीन ठेका देताना वाहन परतावाच्या नावाखाली २ लाख रुपये जास्त घेऊन कामगारांचा फायदा होणार आहे की ठेकेदाराचा ? याचा खुलासा होणे गरजेचे आहे. कचऱ्याची प्रक्रिया करून खत निर्मिती करण्यासाठी ६ लाख रुपये कामगारांच्या भल्यासाठी घेतले जाणार आहे की ठेकेदाराच्या ? सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या ठेक्यात ज्यांना पोसले जाते अशांनी तो अनाधिकृत हिस्सा घेणे बंद केले तरीही कामगारांचे पगार मोठ्या प्रमाणावर अवघ्या २३ लाखात वाढविले जाईल याबाबत सामान्य श्रीरामपूरकरांना शंका नाही अशी प्रतिक्रिया भाजपाचे अक्षय वर्पे यांनी दिली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post