Shrirampur : जय माता दी मित्रमंडळाच्या वतीने होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप

साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मे 2020
श्रीरामपूर | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना रोगाविरुध्द लढण्यासाठी  मनुष्यची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी "जय माता दी मित्रमंडळाच्या" वतीने व नगरसेवक श्री.राजेशजी अलग यांच्या  अध्यक्षतेखाली व माजी उपनगराध्यक्ष श्री. रविंद्रजी गुलाटी यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील 20 हजार नागरिकांना घरोघरी जाऊन  होमिओपॅथी औषधांचा मोफत वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

          या उपक्रमाअंतर्गत गुरुनानक नगर येथे  बंटी गुप्ता व सिंधी समाजाचे सामाजिक युवा कार्यकर्ते श्री.रवि गरेला यांचे हस्ते होमिओपॅथी औषधांचे घरोघरी जाऊन मोफत वाटप करण्यात आले.  यावेळी त्यांच्यासमवेत डाॅ.फरगडे, श्री. बबलुसेठ थापर, महाराज कंत्रोड, श्री.शेळके, श्री.मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


          कोणाला हे होमिओपॅथी औषध मिळाले नसेल किंवा कुणाला हे औषध हवे असेल तर त्यांनी रवी गरेला यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या होमिओपॅथी औषधांचा आपल्या शरीरावर कोणताही साईड इफेक्ट्स होत नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post