साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 मे 2020
सोनई ( दादा दरंदले ) कोरोना या साथीच्या महाभयंकर माहामारी मूळे राज्यात गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाऊन आहे.त्यामुळे शहरी भागात दूध उठाव कमी झाला.दूध दर कमी मिळत असल्याने ग्रामीण शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे.सोनई येथील उच्चशिक्षित तरुण शेतकरी अनिकेत दरंदले यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना या संबंधीचे निवेदन ई मेल करून शेतकऱ्याच्या व्यथा मांडल्या आहेत.
कोरोना या साथीच्या महाभयंकर माहामारी मूळे दुधाचे भाव १७ रु ते २० रु पर्यंत घसरले आहेत त्यामुळे सरकारने दुग्ध,शेतकऱ्यांना लिटरमागे पाच रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावे,अशी मागणी अनिकेत दरंदले यांनी केली आहे.