साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मे 2020
श्रीरामपूर | दर वर्षी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर " यांची जयंती अतिशय मोठ्या थाटामाटाने - उत्साहाने देशात , राज्यात धनगर समाज बांधवांच्या वतीने , भारतीयाकडून सामुहीकरित्या साजरी करण्यात येते ; परंन्तु या वर्षी कोरोना महामारीमुळे संपुर्ण देशात टाळेबंदी असल्याने कुणालाही समुहाने बाहेर पडणे शक्य नसल्याने प्रत्येक धनगर परिवाराने आपापल्या घरीच "मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी " यांच्या प्रतिमेचे सकाळी पूजन करावे व सायंकाळी घरी, घरच्या अंगणात, गँलरीत कमितकमी पाच दिवे प्रज्वलीत करून दिप महोत्सव उत्साहाने साजरी करावी. तसेच फोटो सोशल मिडीयातून प्रसारीत करावेत, असे आवाहन धनगर समाज संघर्ष समितीचे बी.के राशिनकर यांनी केलेली आहे.