Shrirampur : मतदाराला बावळट म्हणणारे आमदार मिळणे श्रीरामपूरचे दुर्भाग्य : भैय्या भिसे

साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 मे 2020
श्रीरामपूर | महाराष्ट्रात कोरोना संकट मोठ्या प्रमाणावर वाढत असताना नागरिकांना कशाची गरज आहे ? याचा विचार न करता घाईघाईने सरकारचा पर्यायाने जनतेचा ९ लाख रूपये निधी साबण व सॅनिटायझर आमदार लहू कानडे यांनी वाटले. मात्र प्रत्यक्षात सॅनिटायझर तर दूरच सोडा पण साबण सूद्धा पूर्णपणे वाटण्यात आल्या नाही हे नगरपालिकेत धूळखात पडलेल्या साबणांवरून उघड झाले. चौकाचौकात हात धुवा मोहिम चालू करण्याची आमदारांची वलग्ना देखील हवेत विरल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते भैया भिसे यांनी केली.


            मतदार संघातील गोर गरिबांना अन्न धान्याची गरज असताना जनतेचा पैसे स्वतःचे चित्र चिटकवून साबण आणण्यात वाया घालणारे आमदार जनतेप्रती किती गंभीर आहे हे उघड झाले आहे. उपासमार होवू नये म्हणून अनेकांनी सोशल मिडियात साबण काय खायच्या का ? असा सवाल विचारला होता. त्याला उत्तर देताना आमदारांनी चक्क बावळट व कवडीभर अक्कल असलेले म्हणणे म्हणजे स्वतः अक्कल पाजळणे नाही का ? मतदार संघाचे पालकत्व करणाऱ्या विद्वान आमदारांना असे बोलणे शोभते का?  स्वत:च्या बुद्धीचा वापर जर जनतेला बावळट म्हणून करणार असाल तर  येणा-या काळात जनता तुम्हांला  तूमची जागा जरूर दाखवेल असा सज्जड इशारा सामाजिक कार्यकर्ते भैय्या भिसे यांनी दिला आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post