
साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 मे, 2020
श्रीरामपूर | सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेच्या शहरातील एटीएम मुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका लक्षात घेऊन आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक श्री तिलक डुंगरवाल यांनी जिल्हाधिकारी श्री राहुल द्विवेदी यांच्याकडे सर्व एटीएममध्ये व त्या एटीएम जवळ हात धुण्यासाठी पाणी साबण त्याच बरोबर आत मध्ये सॅनिटायझर ठेवावे, म्हणून पंधरा दिवसापूर्वी लेखी मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी अग्रणी बँक प्रबंधक म्हणजे सेंट्रल बँक यांच्याशी पत्रव्यवहार करून शहरातील सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेच्या एटीएममध्ये सॅनिटायझर ठेवणे बाबत कार्यवाही करण्याचे दिनांक 20 एप्रिल रोजी आदेश दिले. सहकारी व राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली. शहरातील सर्व बँकेचे एटीएम मध्ये आदेश देऊन जवळपास पंधरा दिवस झाले युनियन बँकेचे एटीएम सोडून इतर बँकेच्या एटीएम मध्ये सॅनिटायझर नसल्याचे उघड झाले सोबतच पाणी व साबणही ठेवण्यात आलेले नाही.
सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असलेला दिसत आहे. देशातील सर्वच यंत्रणा या विषाणूच्या विरुद्ध लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत,त्या विषयी खबरदारी चा उपाय म्हणून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केलेले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. बँका व बँकांचे एटीम देखील लॉकडाऊन मधून वगळले आहेत. या सर्व घटनांच्या चालता नागरिक आर्थिक व्यवहार करण्यासाठी एटीमचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना पहावयास मिळत आहेत. परंतु त्या एटीएम रूम मध्ये संबधित बँकांनी कोणतेही खबरदारीचे उपाय योजना केलेली दिसत नाही कारण अनेक नागरिक दिवसभरात त्या एटिएम मशीनचा वापर करत आहेत आणि त्या मशीनला सूचना देण्यासाठी किव्हा आपला व्यवहार पूर्ण करण्यासाठी एटीएम मशीनला वारंवार हात लावावा लागतो. अशा प्रकारे अनेक ग्राहक त्या मशीनचा वापर करीत आहेत आणि त्या ठिकाणी सॅनिटाईझर नसल्याने अनेक लोक हात सॅनिटाईझर न करताच मशीनचा वापर करीत आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून एखादी व्यक्ती कोरोनाचा संक्रमणाखाली असेल तर त्या व्यक्तीने मशीनचा वापर केला तर त्याचा प्रादुर्भाव इतर सामान्य नागरिकांना होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे, संबंधित बँकांच्या एटीम मशीन जवळ सॅनिटाईझरची व्यवस्था त्या बँकेच्या माध्यमातून केली जावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी बँकेला देऊनही बँकेने नियमाचे पालन केले नाही. म्हणून सर्व बँक अधिकाऱ्यांविरुद्ध कोरोना उपाययोजना कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्या ऐवजी वाढवण्याचा प्रयत्न चालवला असल्याबाबत कायदेशीर गुन्हे दाखल करावे, अशी तक्रार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे तिलक डुंगरवाल यांनी लेखी स्वरूपात करण्यात आली आहे.