साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 मे, 2020
वडाळा महादेव ( राजेंद्र देसाई ) देशात व राज्यात कोरोना महामारी आजाराने थैमान घातले असुन या संकटात अनेक व्यावसायीक तसेच लॉंन्ड्री व्यावसायीक चांगलेच होरपळले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे लॉन्ड्री व्यवसायधारक हे जास्तीत जास्त हातावर पोट भरणारे आहे दररोज व्यवसाय होईल त्यावरच संपूर्ण कुटुबांची गुजराण करतात. परीट धोबी समाजावार उपासमारीची वेळ आल्याने विजबिल कमी करून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.
अनेक कुंटुब भुमिहीन निराधार आहेत तरी लॉक डाऊन काळात सर्वात प्रथम लॉड्री व्यवसाय बंद करण्यात आला कारण नागरीकांनी अफवा पसरवत इस्तरी कपडयामधुन कोरोना आजार पसरतो, अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. त्यामुळे आज सर्वात मोठे संकट परीट धोबी समाज लॉंन्ड्री व्यावसायीक यांच्यावर आली आहे. तरी लॉड्री व्यावसायीकांना या कालावधीत कुठलीही मदत झाली नाही. तसेच बंदच्या काळात लाईट बिल भरावे लागणार तरी श्रीरामपुर तालुक्यातील परीट धोबी बांधवाकडुन प्रशासनास नम्र विनंती आहे कि, लॉंन्ड्री व्यावसायींकांचे बंद काळातील विज बील माफ करावे तसेच दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी लॉन्ड्री व्यावसायीक तसेच समाज बांधवाकडुन होत आहे. तरी शासकिय आदेशांचे पालन करू अशी माहिती समाजबांधवांनी दिली आहे. यासाठी जिल्हाध्यक्ष अंबादास राऊत अध्यक्ष जेष्ठ नागरीक संघटना लक्ष्मणराव निकम, चांगदेवराव भागवत, सिताराम निकम, राजेन्द्र नारायणे, प्रकाश तरटे, दिनेश तरटे, चिंतामणी काळे, जगदीश जाधव, राजेन्द्र देसाई, प्रवीण निकम आदींनी अशी मागणी केली आहे