साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 मे 2020
श्रीरामपूर | राज्यसरकारने परंप्रान्तीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्यास सुरुवात करताच संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे हजारो कामगार एसटी बसने महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सीमेवर गेले. हे मजूर गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यातील अनेक भागात अडकले होते. शहरातील मजूरही जाण्याच्या प्रतीक्षेत होते. तहसील कार्यालयात या मजुरांची नोंद घेऊन वैद्यकीय दाखला, आधार कार्ड, सोबत स्वतंत्र अर्ज घेतले जात होते. परप्रांतीय अनेक मजूर हे अशिक्षित होते. बहुतेक मजुरांना मराठी वाचता लिहिता येत नसल्याने या मजुरांची मोठ्या प्रमाणात कुचबना झाली व नेत्यांनी आपले मतदार नसल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पण तेही विसरले की हे आपले भारतीयच आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एनंतपुर भागातील बाटलीचे कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांनी महाराष्ट्र सुरू उद्योग कामगार कर्मचारी युनियन मुंबई, आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची संपर्क संपर्क साधला.
मजुरांची भाषेची होणारी अडचण व त्यांना तहसील कार्यालयामध्ये प्रिंट केलेला अर्ज न भरता येणे. या बाबीचा विचार करून कामगार नेते नागेश सावंत, आम आदमी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल, राजू यादव, सलीम शेख, सुरेंद्र मासाळकर, बी एम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी परराज्यातील कामगारांना सहकार्य केले.
कामगार व महसूल अधिकारी, आरोग्य अधिकारी यांच्यामधील महत्वाची समन्वय साधण्याची भूमिका या कार्यकर्त्यांनी पार पाडली. जाणाऱ्या कामगार मजुरांना प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार राहुल पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे, आगार व्यवस्थापक राकेश शिवदे, नगरपालिकेचे डॉक्टर सचिन परे ,आरटीओ अधिकारी धनवट, नायब तहसीलदार उगले, डॉक्टर मुकुंद शिंदे, धीरज साळवे, यांच्यासह महसूल, एसटी महामंडळ ,आरोग्य खात्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला यावेळी अनेक मजुरांचे डोळ्यामध्ये आनंद आश्रू दिसत होते तर लहान मुलांनचे चेहरे आनंदाने फुलले होते.