साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 मे 2020
श्रीरामपूर |कोरोनामुळे जगभरात लाखो मृत्यू झाले. संवेदनशील मनाचे लोक त्यामुळे प्रचंड निराशावादी बनलेत. अशा परिस्थितीती अशांनी केवळ कलेच्या सानिध्यात आल्यास त्यांना सकारात्मक उर्जा मिळू शकते, असे प्रतिपादन प्रख्यात चित्रकार विवेक प्रभूकेळूस्कर यांनी केले.
श्रीरामपूर येथील रंगलहरी आर्ट ॲकॅडमीच्यावतीने आयोजित ऑनलाईन उन्हाळी शिबिरात पालकांशी संवाद साधताना केळूस्कर बोलत होते. चित्रकार उदावंत व भागवत यांनी दरवर्षी होणारी उन्हाळी चित्रकला शिबिर यंदा कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने घेतले. शिबिराच्या पहिल्याच भागात राज्यभरातील सुमारे ३० हून अधिक जिल्ह्यातील चार वर्षांच्या बालकापासून ५५ वयाच्या ज्येष्ठ कलारसिकांनी सहभाग नोंदविला. समारोपाप्रसंगी आयोजित ऑनलाईन सेशनमध्ये प्रभूकेळूस्कर मुंबई येथून, मोटीव्हेशनल ट्रेनर विजय बनकर ब्राम्हणी येथून तर साहित्यीक पत्रकार विकास अंत्रे सोनगाव येथून सहभागी झाले होते.
चित्रकार प्रभूकेळूस्कर म्हणाले, चित्रपट क्षेत्रात स्टोरी बोर्ड कलाकार, वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार, जाहीरात क्षेत्रात ॲनिमेटर, ऑटोमोबाईल क्षेत्रात डिझायनर अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये चित्रकलेल्या माध्यमातून व्यावसायीक संधी निर्माण होऊ लागल्या आहेत
साहित्यीक अंत्रे म्हणाले, सध्या शालेय गुणांच्या रेसमध्ये पालक पाल्यांना गुणवत्तेसाठी पाठ्य पुस्तकांच्या पलिकडे जाऊ देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थी गुणांनी हुषार होत असला तरी त्यांच्यातील जिज्ञासा, चौकस वृत्ती, विचार करण्याची क्षमता आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती लोप पावत चालली आहे. यापार्श्वभूमीवर आपल्याला मुलांमधील संवेदनशिलता, सृजनशिलता वाढवायची असेल तर त्यांना कलेच्या सानिध्यात आणल्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही.
मोटिव्हेशनल ट्रेनर बनकर म्हणाले, चित्रकलेसारखा विषय ऑनलाईन शिकवला जाऊ शकतो का? असा मोठा प्रश्न अनेकांसमोर होता. मात्र भागवत व उदावंत यांनी तो सकारात्मकरित्या सिद्ध करून दाखविला. कारोनाशी लढण्यासाठी आपली शारिरीक प्रतिकार शक्ती चांगली असणे गरजेचे आहे त्याच बरोबर आपली भावनिक व मानसिक प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर कलेशिवाय पर्यार नाही. हा प्रयत्न म्हणजे परिवर्तानाचा, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जगाशी जोडण्याचा, नवीन तंत्रज्ञान आत्मसाद करून कमी कालावधीत आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा, ग्रामीण भागातील कलाकारांना जगाच्या पटलावर व्यासपिठ मिळण्याचा उपक्रम आहे. अहमदनगर आकाशवाणीचे निवेदक संतोष मते, अवधूत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अहमदनगर आकाशवाणीचे निवेदक संतोष मते यांनी भोकर येथून तर अवधूत कुलकर्णी यांनी श्रीरामपूर येथील आपल्या निवासस्थानाहून मनोगत व्यक्त केले. चित्रकार उदावंत यांनी प्रास्ताविक केले तर सुत्रसंचालन व आभार भागवत यांनी मानले.
या ऑनलाईन सेशनमध्ये श्रीरामपूर येथील डॉ. रविंद्र कुटे, डॉ. डॉ. अनिकेत चव्हान, सुदर्शन रानवडे, डॉ. सुनिता राऊत, निवृत्त पोलिस निरिक्षक प्रकाश सपकाळे (नाशिक), सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, (सांगली), प्रसाद मांढरे (अहमदनगर) अनुप्रिता डांगे (बारामती), निलेश हाडवाळे (औरंगाबाद), तृप्ती देवचक्के, वैशाली देवचक्के (नेवासा), सचिन मोरे (जळगाव), मंजिरी खाडिलकर (धुळे), सुधीर बोडखे (ठाणे), निलम खोत (सातारा), सुशांत भांगे (नागपूर), यश कपूर (पुणे) आदींसह राज्यभरातील अनेध पालकांनी सहभाग घेतला.