साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 मे 2020
वडाळा महादेव | वार्ताहर | श्रीरामपूर येथील डॉक्टर दांपत्य सध्या पुणे येथे व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहे. सध्या कोरोना महामारी आजाराने संपूर्ण देशात तसेच राज्यात थैमान घातले असून पुणे शहर व परिसरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तरी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच आरोग्य धोक्यात आरोग्य धोक्यात असून शासकीय आदेशाप्रमाणे पोलीस प्रशासन आज कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. यामध्ये येथील डॉक्टर वैभव कडभने तसेच सौ अश्विनी वैभव कडभने या दांपत्याकडून पुणे येथील सांगवी पोलीस स्टेशन मध्ये होमिओपॅथिक प्रतिबंधात्मक औषधे वितरण केले.
यावेळी पोलीस निरीक्षक श्री अजय भोसले तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते. सध्या पोलीस बांधव अहोरात्र कर्तव्य बजावत असल्याने आरोग्याच्या दृष्टीने होमिओपॅथिक प्रतिबंधक औषधांचे वितरण केल्याचे डॉक्टर वैभव कडभने यांनी माहिती दिली. याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री अजय भोसले तसेच त्यांचे सहकारी कर्मचारी वर्ग यांचेकडून डॉक्टर वैभव कडभने व आश्विनी कडभने यांचे आभार मानण्यात आले.