Breaking : अहमदनगर जिल्ह्यात 'त्या' ठिकाणी 4 जण कोरोनाबाधित ; चिंता वाढली

साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 मे 2020
अहमदनगर | संगमनेर तालुक्यातील ०४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यातील एक जण काल नाशिक येथे बाधीत आढळून आलेल्या रुग्णाची नातेवाईक आहे तर दुसऱ्या व्यक्तीला न्युमोनियाचा त्रास जाणवत असल्याने  रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे दोघे संगमनेर शहरातील आहेत. आणखी एक जण निमोण येथील आहे. निमोण येथील त्या व्यक्तीचा आज सकाळी येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला त्यात तो बाधीत असल्याचे स्पष्ट झाले.

          दरम्यान, निमोण येथीलच एक व्यक्ती नाशिक येथे बाधीत आढळून आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६६ झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. इतर २३ अहवालही प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

          आज सायंकाळी पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालया कडून २६ जणांचा अहवाल प्राप्त झाला.त्यात हे तिघे बाधित आढळून आले. बाधीत आढळलेली ५७ वर्षीय महिला ही काल नाशिक येथे बाधीत आढळलेल्या रुग्णांची नातेवाईक असून दुसरा ५२ वर्षीय व्यक्ती हा संगमनेर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. सध्या, नाशिक येथे बाधीत आढळलेला रुग्ण हा मुळचा निमोण येथील असून त्यांचा मुलगा नाशिक येथे कॉन्स्टेबल असल्याने त्यांना तिकडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला.

          आतापर्यंत एकूण १८७३ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १७४१ स्त्राव निगेटिव्ह आले तर ६६ व्यक्ती बाधित असल्याची माहिती त्यांनी दिली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post