साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 मे 2020
श्रीरामपूर | तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील गावकऱ्यांच्या अर्थिक सहभागातून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक डी.बी.उजे यांच्या हस्ते करण्यात आले.
" परिस्थिती कितीही असो गंभीर! आम्ही तितकेच आहोत खंबीर !" याची प्रचिती बेलापूरकरांनी वेळोवेळी दिली आहे . कोरोनाच्या प्रादुर्भावातून लागू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत बेलापूर खुर्दच्या सामान्य नागरिकांपासून ते नेते , पुढारी , सेवा संस्था , देवस्थाने यांनी श्रेयाची , नावाची किंवा प्रशंसेची अपेक्षा न करता सर्वांच्या सहभागातून गोरगरीब नागरिकांस आतापर्यंत अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे . त्याचाच एक भाग म्हणून गावच्या सरपंच सौ.अनुराधा गाढे , हरिहर केशव गोविंद पतसंस्था , पो.पा.बारहाते , पो.पा.युवराज जोशी , राहूरी साखर कारखान्याचे संचालक द्वारकानाथ बडधे , चंद्रकांत मते , राजेंद्र एकनाथ भगत , बेलापूर खुर्द सेवा संस्थेचे चेअरमन कैलास वाकडे , चंद्रशेखर गाढे , कारभारी भागवत , प्रवरा टी हाऊसचे संतोष रामचंद्र बडधे , प्रकाश राजुळे , ॲड.दीपक बारहाते , योगेश शहाणे आदींच्या सहभागातून गावातील विधवा , मजूर व दलित वस्तितील नागरिकांना गहू , तांदूळ , डाळ , गोडतेल , मिठपुडे आदी प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप बेलापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक डी.बी.उजे यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी मास्क लाऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले .स.पो.नि. श्री उजे यांनी ग्रामस्थांना या सेवाकार्याबद्दल धन्यवाद दिले .