Shrirampur : श्रीरामपूर शहरात व ग्रामीण भागातील नागरिक अन्नावाचून उपाशी राहू नये ; आ. राधाकृष्ण विखे पाटील, श्रीरामपूरात मोफत अन्नक्षेत्र सुरुवात...!

साईकिरण टाइम्स ब्युरो, 10 मे 2020
श्रीरामपूर | विठ्ठल गोराणे | श्रीरामपूर तालुक्यातील तीन ठिकाणी मोफत अन्नक्षेत्राचे आ. राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे प्रमुख उपस्थितीत जेवणाची पाकिटे वाटप सुरू करण्यात आले असून स. १० :०० वा ते दुपारी १:00 वा या वेळेत दररोज अन्नदान होणार असल्याचे मा. सभापती दिपकराव पटारे यांनी सांगितले.

          यावेळी बोलताना आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की सर्व सामान्य गोर गरिबांना लाॅकडाउन मुळे हाताला काम नसल्याने करोना च्या या महामारीत उपासमारीची वेळ आली आहे. गावातील पुढाऱ्यांनी कोणत्याही गटातटाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून या महामारीत एकमेकांना माणुसकी च्या धर्माने कोणीही उपाशी राहू नये यासाठी मदत केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील तसेच माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या पुढाकाराने मुळा प्रवरा विज वितरण संस्थेच्या माध्यमातून आज तीन ठिकाणी अन्नक्षेत्र  सुरक्षित अंतर ठेवून व नियमांचे पालन करुन सुरू करण्यात आले आहे. खा.डॉ.सुजय दादा विखे पाटील हे संकटा प्रसंगी मदतीला धावून येण्याचा आजोबांचा वारसा पुढे घेऊन सर्व सामान्य गोर गरिबांच्या मदतीस धावून आले असल्याचे दिसत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील संगमनेर रोडवरील शुभम मंगलकार्यालय येथे सकाळी १०:०० वाजता, पुणतांबा रस्त्यावर भैरवनाथनगर येथील डावखर लॉन्स येथे सकाळी ११:00 वा तसेच हरेगाव येथे सकाळी ११:३० वा बेलापूर कंपनीच्या शाळेत सदर अन्नक्षेत्र सुरू करण्यात आले आहे. या सुरू केलेल्या अन्नक्षेत्राचे प्रवेश द्वारात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे हात सॅनिट्राईझरने वाॅश केल्यानंतर स्कॅनिंग मशीन द्वारे शरीराचे तापमान मोजून प्रवेश दिला जातो तसेच स्वयंशिस्त पाळून लाभ घ्यावा असे आवाहन केले जाते. त्याचप्रमाणे या अन्नक्षेत्रातुन जवळपास असलेल्या गावांमध्ये जेवनाचे पॅकेट पुरवले जाणार आहेत. या उदघाटन प्रसंगी माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सामाजिक बांधिलकी म्हणून परिसरातील सामाजिक संस्था, गावातील पुढारी तसेच दानशूर व्यक्तींनी पुढे येवून सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले. त्याचप्रमाणे उद्या बेलापूर येथे व निपाणीवाडगाव अशोकनगर येथे अन्नक्षेत्र सुरू करण्यात येणार आहे असे आ. राधाकृष्ण विखे पाटील जाहीर केले. 


       यावेळी शहरातील मा. आ. भाऊसाहेब कांबळे, नगरसेवक बाळासाहेब गांगड, शामलिंग शिंदे, केतन खोरे, जितेंद्र छाजेड, दिपक चव्हाण, वैशाली चव्हाण, राजेश अलघ, रवींद्र गुलाटी, संतोष कांबळे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नितीन भागडे , माजी सभापती नानासाहेब पवार, अशोक चे संचालक सुरेश पाटील गलांडे, संचालक गिरीधर आसने, राधाकृष्ण आहेर, सोन्याबापू शिंदे, भाऊसाहेब बांद्रे, कैलास बोर्डे, जितेंद्र गदीया,  नितीन आसने, सरपंच संदीप शेलार, दिपक नवगिरे, बोधक, सतिश कानडे, आशाताई मोरे,अशोक मोरे, मनोज हिवराळे, सुर्यकांत डावखर, प्रतापराव देसाई,संदीप चव्हाण,नानासाहेब तुपे,शंतनु फोपसे, रोहित शिंदे, प्रकाश पाटील, बाजार समितीचे सचिव किशोर काळे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आभाळे, मुळा प्रवराचे करपे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post