Belapur : पद्मश्री कै. बाळासाहेब विखे पाटील जयंतीमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 मे, 2020
बेलापूर  ( प्रतिनिधी ) सहकार महर्षी लोकनेते पद्श्री कै बाळासाहेब विखे पाटील यांच्या जंयती निमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचे उदघाटन बाजार समितीचे माजी सभापती दिपक पटारे यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.  

                 लोकनेते पद्श्री मा बाळासाहेब विखे पा.यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जनसेवा मंडळ श्रीरामपूर डाँ विखे पाटील हाँस्पिटल विळदघाट पंचायत समिती श्रीरामपूर  यांच्या सहकार्याने डाँक्टर  आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे माजी सभापती दिपक पटारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

          यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,   उपसभापती बंडू तोरणे,  हाजी ईस्माईल शेख,  शकील शेख,  शफीक आतार,  रविंद्र गायकवाड,   दस्तगीर शेख,  केंद्र प्रमुख उत्तम शेलार, मुख्याध्यापक  नंदकुमार परदेशी,  बाळासाहेब शेलार, प्रभाकर ताके,  सतीश शेलार, राजेंद्र कुताळ,  शांतवण अमोलिक,  शोएब शेख,  शुभम नवले,  विष्णुपंत डावरे, अरुण अमोलिक उपस्थित होते. तपासणी पथकात डाँ.सचिन चौधरी, डाँ. सोहम मदनकर, सिस्टर उषा थोरात, बापु बलमे, सुदाम भागवत, प्रदिप लोखंडे आदिंचा सहभाग होता. सोशल डिस्टनचा नियम पाळुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post