साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 मे 2020
प्रतिनिधी । उक्कलगाव |नगर - सुपे जवळ कंटेनरच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाल्याची घटना (दि.22) शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पारनेर तालुक्यातील सुपे गावाजवळ घडली. या कंटेनरच्या भीषण अपघातात ठार झालेल्या मयतामध्ये दत्तात्रय लक्ष्मण गांगुर्डे( वय 27), केशव हरिभाऊ बर्डे (वय 30) असे ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते दोघेही श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे आठवाडीतील आहे.

सविस्तर माहिती अशी की,शिरुरहून मोटार सायकलवरून घरी येत असतानाच सुप्या नजीक हाॅटेलत नष्टा पाणी घेऊन नगरला दिशेने निघून ते दोघे नगर जवळील नांदगाव शिगंवे जवळपास आले असता, येथून आपला मोबाईल हाॅटेलतच विसरला म्हणुन पुन्हा ते दोघे नांदगाव शिंगवेहून माघारी जात सुप्यानजीक येताच शिरुरहून भरधाव वेगाने येणार्या कंटेनरने मोटारसायकल दोघांना जागीच चिरडून कंटेनर जागेवरून पळुन गेला.दुर्दैवाने रात्रीची वेळ असल्याकारणाने त्या दोघांचे मृतदेह रात्रभर जागेवरच पडून होते. सकाळीच स्थानिकच्या मदतीने पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच पहाटेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले होते. पुढील कारवाई झाल्यानंतर मयतांना नातेवाईकांच्या ताब्यात दिले असता कोरोना प्रादुर्भावमूळे लाॅकडाऊन सुरू असल्याने ते इतर काही कामगार वीटभट्टीवर कामास होते सुट्टी असल्यामूळे इतर काही महिला व पुरुष कामगार ट्रकमधून आठवाडीत आधी घरी आले होते आणि हे दोघे मोटार सायकलवरून घरी येत होते कंटेनर जबरदस्त धडकेने चेंदामेंदा झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडले होते कंटेनर अंगावरून गेल्याने त्या दोघांही जागीच ठार झाले.आज (दि.23)शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अत्यंत शोकाकूल वातावरणात एकलहरे आठवाडीत अंत्यसंस्कार करण्यात आले.