साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 मे 2020
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) शहरातील गाजलेल्या घनकचरा व्यवस्थापन ठेका वाढीव रकमेने ८ लाख रुपये जास्त रकमेने सद्गुरू बहूउद्देशीय संस्था, तळोदा, जि.नंदुरबार यांना देण्याचा सत्ताधारी गटासह काही नगरसेवकांचा डाव सर्वपक्षीय नगरसेवकांनी अमान्य करत हाणून पाडला. भाजपने केलेल्या आवाहनाला सर्व नेत्यांनी साथ दिल्याने जनतेचे कोट्यवधी रुपये वाचल्याची भावना भाजयुमोचे युवानेते अक्षय वर्पे यांनी व्यक्त केली आहे.
नगरपालिकेने शहरात घनकचरा व्यवस्थापन ठेका २३ लाख रुपयांना प्रति महिना दिशा एजन्सीला दिला होता. कामाची मुदत संपल्यावर निघालेल्या निविदा प्रक्रियेत सद्गुरू बहूउद्देशीय संस्थेला सदर ठेका ३२ लाख रुपयांना देण्यात यावा म्हणून विशेष सभा आयोजित केली. सर्क्युलरनुसार नगरसेवकांच्या घरी जाऊन निविदा मान्य अथवा निगोसियशन असा कॉलम ठेवण्यात आला. अमान्य हा कॉलम गायब करण्यात आल्याने सत्ताधारी गटाने स्वतःहून पराभव मान्य केल्याचे चित्र होते. सत्ताधारी गटातील नगरसेविका स्नेहल केतन खोरे, दीपक बाळासाहेब चव्हाण, वैशाली दीपक चव्हाण, जितेंद्र छाजेड, शीतल आबासाहेब गवारे, संतोष कांबळे या सहा नगरसेवकांनी वाढीव रकमेच्या ठेक्याला विरोध नोंदविणे ही शहरवासीयांसाठी जमेची बाजू आहे. ज्येष्ठ नगरसेविका भारती कांबळे, शहराध्यक्ष किरण लुणिया यांच्यासह विरोधी गटाचे करण ससाणे, संजय फंड, मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, श्रीनिवास बिहाणी, भारती परदेशी, मीरा रोटे, आशा रासकर, मनोज लबडे शेख गटाचे अंजुम शेख, राजेश अलघ, ताराचंद रणदिवे, जायदाबी कुरेशी, समीना शेख, जयश्री शेळके यांनी वाढीव रकमेला केलेला कडाडून विरोध स्वागतार्ह असल्याचे भाजप नेते गणेश राठी, तालुकाध्यक्ष सुनील वाणी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शशिकांत कडूस्कर, माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले, राजेंद्र कांबळे ,बाळासाहेब अहिरे, विलास थोरात, युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, विशाल यादव, रवी पंडित, अक्षय नागरे, निलेश जगताप, अमोल आंबिलवादे यांनी म्हटले आहे.
22 लाखावरून 32 लाख रुपये प्रतिमहिना स्वच्छतेचा ठेका देण्याचा घाट नगराध्यक्षांसह काही नगरसेवकांनी घातला आहे. हा ठराव बहुमताने फेटाळ्याने नगराध्यक्षांचा पराभव आहे.
- करण ससाणे , उपनगराध्यक्ष
सत्ताधारी गटातील नगरसेवक दीपक चव्हाण, शीतल गवारे, जितेंद्र छाजेड, संतोष कांबळे, वैशाली चव्हाण, स्नेहल खोरे या आमच्या सहा नगरसेवकांनी जनहिताची भूमिका घेतली. सत्ताधारी गटाचे असलो तरी चुकीच्या विषयाला विरोध करण्याची आमची क्षमता असून आम्ही कायम जनहीतासोबत असल्याची प्रतिक्रिया मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिले.