साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 मे 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्याच्या चारही बाजूला कोरोना बाधित क्षेत्र आहेत, स्थानिक प्रशासनाने श्रीरामपूर शहराची बाजार पेठ चालू करण्याचा निर्णय रमजान ईदच्या पहिले घेतला तर या वेळे मध्ये एक पण कोरोना बाधित रुग्ण आढळला तर सर्व खापर हे मुस्लिम समाजावर फुटेल याचीही स्थानिक प्रशासनाने विचार करावा आणि या काळात मालेगाव, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील नागरिक श्रीरामपूर शहरात येण्याचे भिती सुध्दा वाढेल. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने श्रीरामपूर शहराची बाजार पेठ २५ मे म्हणजे रमजान ईदनंतरच चालू करावी , असे अखिल भारतीय सेनेचे तालुकाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.