Shrirampur : श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा सुरु होणार ; स्थानिक लोकप्रतिनिधीच्या प्रयत्नांना यश

7
साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 मे 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूरची बाजारपेठ पुन्हा सुरळीत होण्याकरिता आज प्राशकीय कार्यालयात लोकप्रतिनिधीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, डीवायसपी राहुल मदने, पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.समीर शेख वाहतूक शाखेचे देशमुख उपस्थित होते.

            कोरोना नंतर तब्बल दोन महिन्यांच्या कालावधी नंतर श्रीरामपूरची बाजारपेठ सुरु करावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती ; नामदार  थोरातांनी लगेचच जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांना सूचना देऊन श्रीरामपूरातील व्यवहार चालू  केले होते. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे प्रशासनाने बाजारपेठ बंद झाली होती.  

              सर्व शासकीय नियमांचे पालन करुन योग्य ती उपाय योजना करुन सर्व प्रकारची खबरदारी घेऊन श्रीरामपूरच्या नागरिकांची आणि व्यापाऱ्यांची काळजी घेऊन  श्रीरामपूरातील बाजारपेठ सुरळीतपणे  चालू व्हावी, याकरिता उपस्थितीत असलेल्या लोकप्रतिनिधीं आग्रही होते . त्यानुसार विशिष्ट दिवशी विशिष्ट रोड खुले करावे या धोरणानुसार श्रीरामपुरातील व्यवहार चालू होणार आहे.

         आज पर्यंत श्रीरामपुरातील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी यांनी अथक प्रयत्न करुन श्रीरामपूर शहर व तालुक्याची परिस्थिती उत्तमरीत्या हाताळली आहे त्यामुळे बाजारपेठ चालू झाल्यानंतर खबरदारी घेऊन बाजारपेठ चालू करावी आणि जनतेने आणि व्यापाऱ्यांनी शासकिय नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित लोकप्रतिनिधींनी केले आहे.


शहरातील काही प्रमुख व्यापाऱ्यांनी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतल्यानंतर विखे पाटील व जिल्हाधिकारी यांची दूरध्वनीवर तब्बल १५ मिनिटे चर्चा झाली. श्रीरामपूरची बाजारपेठ सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची सूचना विखेंनी केल्याने बाजारपेठ सुरू करण्याच्या निर्णायाने गती घेतली आहे. व्यापारी बांधवांना विखे साहेबांनी आधार देत तात्काळ अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतल्याने समाधानाचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी दिली.



Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post