Shrirampur : सिमरन शेख हिचा रमजानचा उपास यशस्वीपणे संपन्न

साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 मे 2020
टिळकनगर (वार्ताहर) श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील आरीप शेख ह्यांची कन्या सिमरन शेख  वय 4  लहान ह्या चिमुरडीने  रमजान महिन्याचा उपास यशस्वीपणे पार पडला. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याच्या उपास एप्रिल / मे या कडक उन्हाळ्यात सुरू झालेले आहे. या पुर्वी हे उपास पावसाळ्यात, हिवाळ्यात होत असे मात्र चालू वर्षात अत्यंत कडक उन्हाळ्यात उपास सुरू झाल्याने उपासकांची मोठी कसरत होत आहे. त्यात या लहान चिमुरडीने  उपास ठेऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे.


         उपास यशस्वी पार पडला म्हणून सिमरन हिचे  जि.प. चे माजी अर्थ व बांधकाम  समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समितीच्या सभापती संगीताताई शिंदे, जि.प. सदस्या आशाताई दिघे, सरपंच सुनील शिरसाठ, उपसरपंच सारिका कुंकलोळ, खादी ग्रामउद्योगचे अध्यक्ष प्रेमचंद कुंकलोळ, ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब शिंदे, टिळकनगर कामगार पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे, आर.पी. आयचे जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर सह सर्व स्थरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post