साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 मे 2020
सात्रळ |बाबासाहेब वाघचौरे | राहुरी तालुक्यातील सात्रळ, सात्रळ ग्रुप सोसायटी अंतर्गत माळेवाडी डुक्रेवाडी येथील १५३ प्रधानमंत्री गरिब कल्याण अंत्योदय योजनेच रेशन धारकांचे रेशनचे ठराविक रक्कम जमा करून लाभार्थाना गहू,तांदूळ, साखर मोफत रेशन वाटप करण्यात आले.
यावेळी कोरोनोच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने लाॅकडाउन असल्यामुळे सर्व सामान्य जनतेची उपासमार होऊ नये.या दृष्टीने सात्रळ येथील कुटुंबाच्या आर्थिक अडचणी लक्षात घेत माजी सरपंच बाळासाहेब चोरमुंगे यांनी मोफत धान्य वाटप केले. सर्व सामान्य जनतेच्या हाताला काम नसल्यामुळे यांनी एक प्रकारचे सामजिक दायित्व जपले. याठिकाणी यावेळी चोरमुंगे म्हणाले कि,अंत्योदय योजनेच्या लाभार्थाना अडचणी समजून घेत अपेक्षित व गरजू लोकांना मोफत धान्य मिळणार आहे.असे आवाहन त्यांनी केले. तसेच रेशन दुकानदार सुरेश डुक्रे यांनी सोशल डिशटिंगचा वापर करत गर्दी न करता योजनेचा लाभ ग्रामस्थांना दिला. यावेळी हंबीरराव कडु,मिरन तांबोळी,तुषार चोरमुंगे, अनिल डुक्रे आदि उपस्थित होते.