Shrirampur : बेलापूर पाणीपुरवठा जल शुध्दीकरण केंद्राची दुरावस्था

साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 मे 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असुन तलावा पासुन ते पाणी शुध्दीकरण केंद्रापर्यत असणार्या सर्व यंत्रणेची साफसफाई वेळेवर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

            याबाबत प्रसाद खरात या नागरीकाने पाणी शुध्दीकरण तलावाचे काही फोटो काढुन व्हाँटसअप वर टाकले होते त्यामुळे ग्रामस्थांनी पाणी पुरवाठ्याकडे लक्ष देवुन गावाला शुध्द पाणी पुरवठा करा लोकांच्या आरोग्याशी खेळू नका अशा कमेंट गृपवर टाकल्या होत्या त्यांची दखल घेवुन गावातील जागृक नागरीक व पत्रकारांनी समक्ष जावुन पाणी पुरवठा विभागाची पहाणी केली या वेळी तलावातून आलेले पाणी तुरटी व टि सी एल टाकुन स्वच्छ केले जात असल्याचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी पत्रकारांना सांगितले.

          यावेळी टँक केव्हा साफ केला टाकी केव्हा साफ केली पाणी पुरवठ्याला भेट देणारे आधिकारी केव्हा आले या बाबत विचारले असता रजिस्टर ग्रामपंचायत कार्यालयात असल्याचे सांगण्यात आले पाणी शुध्दीकरण तलावातील साचलेला गाळ केव्हा  वाँश आऊट केला या बाबतही निश्चित तारीख व वेळ सांगता आली नाही पाणी शुध्दीकरण करण्याचे तीन हौद असुन या तिनही हौदातुन पाणी शुध्दीकरण कले जाते परंतु हे हौद कमीत कमी आठ दिवसातून एकदा वाँश आवुट केले पाहीजे परंतु तसे होताना दिसत नाही ज्या फिल्ट्रेशन टाक्यातुन पाणी गाळल जात त्या वेळी पाण्यातील सुक्ष्म कण वाळूच्या कणात साचले जातात व ही वाळू घट्ट दगडा सारखी होत त्या मुळे पाण्याच्या टाकीतील प्रेशर वाढत ,ज्या वेळी ठरावीक दाबा पेक्षा जास्त दाब टाकीत होतो,हे दाखवण्या साठी टाकीला प्रेशर गेज असतो,अशा वेळी टाकी रिव्हर्स फ्लो ने टाकी स्वच्छ करावी  लागते ,या प्रक्रीयेत पाण्याच्या टाकीत जाणारा प्रवाह बंद करून ,बाहेर पडणाऱ्या बाजूने पाणी टाकीत सोडले जात त्यामुळे वाळू उपळते व त्यात अडकलेले मातीची कण मोकळी होतात व फ्लश पाईप वाटे बाहेर पडतात.याला रिव्हर्स फ्लशींग अस म्हणतात.

         अशा प्रकारे गाळ व्यवस्थेची देखभाल ठरावीक दिवसांनी सतत करावी लागते. गावाला पाणी पुरवठा करणार्या टाकीत केवळ तीन किलो टि सी एल पावडर टाकली जात असल्याची नोंद त्या ठिकाणी असलेल्या रजिस्टर मध्ये आढळून आली परंतु नेमके प्रमाण किती हे ही संबंधित कर्मचार्याला सांगता आले नाही त्यातही टि सी एल टाकण्याच्या नोंदी देखील  वेळेवर घेतल्या गेलेल्या नाहीत सदर रजिस्टरमध्ये मार्च पर्यंतच नोंद केलेली आढळून आली या बाबत असे का आसे विचारले आसता महीना अखेरीस महीन्याची नोंद ओढतो असे सांगण्यात आले मग आता मे महीना सुरु असुन एप्रिल महीन्याच्या नोंदी कधी ओढणार या बाबत समाधान कारक उत्तर देता आले नाही  तसेच पाणी पुरवठ्याला जोडलेल्या विज मोटारी करीता असलेला विज वाहक पँनल बोर्ड उघड्यावरच होते  त्यातील काही तारा फ्यूजा उघड्यावरच पडलेल्या होत्या यामुळे एखाद्या पाणी पुरवठा कर्मचार्याच्या जिवीताला धोका होवु शकतो हे पदाधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले असता तातडीने पँनल बोर्डची दुरुस्ती केली जाईल असे अश्वासन रविंद्र खटोड यांनी दिले खरात यांनी टाकलेला फोटो व प्रत्यक्ष पहाणी करताना दोन्ही फोटोत असलेला फरक ग्रामस्थ व पत्रकाराच्या लक्षात आला पत्रकार येण्यापुर्वी बर्याच ठिकाणी साफ सफाई केल्याचे दिसुन आले   गावाला पाणी पुरवठा करणारी स्वतंत्र यंत्रणा असली तरी ती कार्यरत नसल्याचे जाणवले उपसरपंच रविंद्र खटोड बाजार समितीचे संचालक सुधीर नवले जावेद शेख यांनी पाणी पुरवठ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्याचे अश्वासन दिले या वेळी बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सरपंच असतानाच जल शुध्दीकरण केद्राचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे असाताना पाणी पुरवठ्याचा निधी दुसरीकडे वापरल्यामुळे आज ही अवस्था झाली असुन आज त्याच कामाचे नियोजन केल्यास तिप्पट खर्च  लागणार असल्याचे सांगितले बेलापूर गावाला पाणी पुरवठा करणारी योजना ही सन १९७० साली कार्यन्वित झाली असुन त्या वेळळेची लोकसंख्या गृहीत धरुन ती योजना सुरु केली होती आज लोकसंख्या चार पटीने वाढली आहे त्यामुळे जल शुध्दीकरण केंद्राचेही विस्तारीकरण करणे गरजेचे  असुन पाणी शुध्दीकरण करताना रिव्हर्स फ्लँशिंग पध्दतीचा वापर केल्याचे दिसतच नाही  ही गंभीर बाब आहे असल्याचे मत सुधाकर खंडागळे यांनी व्यक्त केले. उपसरपंच रविंद्र खटोड जावेद शेख बाजार समितीचे संचालक सुधीर नवले सुधाकर खंडागळे भास्कर बंगाळ व पत्रकार उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post