साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मे 2020
श्रीरामपूर | केंद्र शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून नगरपरिषदांना प्राप्त होणाऱ्या अनुदानातील ५० % बंधनकारक रकमेतून शहरातील घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत साफसफाई होण्याबाबत निर्देश आहे. त्यानुसार पालिकेने निविदेमार्फत ३३ लाख ८९ हजार ४२१ रुपये इतक्या रकमेत देण्यात आहे. यात खत प्रक्रियेच्या कामाचे ६ लाख ४९ हजार ५०० रुपये तसेच वाहन परतावा २ लाख ६ हजार ४०० हे वजा होणार आहेत. निव्वळ २५ लाख ६३ हजार ५२१ इतकी रक्कम नवीन ठेकेदारास जाणार आहे. त्या रकमेचेच बील त्यास दिले जाणार आहे. याबाबत कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये, असे नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत साफसफाईचे घर ते घर कचरा संकलन करणे, हॉटेल, फळ विक्रेते व्यावसायिक यांच्याकडील कचरा संकलन करणे, शहरातील रस्ते व मैदाने झाडू सफाईकरणे, गटारे, नाले चेंबर सफाई करणे, सार्वजनिक शौचालये व मुतारी सफाई करणे या दैनंदिन स्वच्छतेच्या कामाचा ठेका देण्यात आलेला आहे.
पालिकेने मागील ठेका २२ लाख ९८ हजार ६५१ रुपयात देण्यात आला होता. हा ठेका आता ३३ लाख ८९ हजार ४२१ रुपयात देण्यात आला असला तरी यातून २ लाख ६ हजार ४०० रुपये गाडी परतवा पालिकेला मिळणार आहे. तसेच ६ लाख ४९ हजार ५०० रुपयांची रक्कम ही ठेकेदारास त्याने जेवढ्या प्रमाणात खत निर्मिती करेल तेवढीच रक्कम त्यास अदा केली जाणार आहे.
तरी या रकमेबाबत आरोप करणाऱ्यांनी योग्य अभ्यास करुन शहानिशा करावी, असे नगराध्यक्षा आदिक यांनी सांगितले.
मागील वर्षाची ठेकेदार एजन्सी दिशा एजन्सी, पुणे यांना देखील मुख्य कामांचा स्वच्छता ठेका त्यांनी सादर केलेल्या ऑनलाईन दरपत्रकामध्ये तडजोड करुन झालेल्या तडजोडीनुसार मासिक रुपये २२ लाख ९८ हजार ६५१ इतक्या रकमेस देण्यात आलेला होता. सदर संस्थेच्या प्रथम वर्षाच्या कामाची मुदत संपत असल्याने सदर संस्थेस मुदतवाढ देण्यातबाबतचा विषय सर्वसाधारण सभेत सदर एजन्सीचे काम असमाधानकारक असल्याने फेटाळण्यात आल्याने नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत ठराव संमत करण्यात आला.
सदर घनकचरा कामाची नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांच्याकडून निविदा बाबत कामाचा प्रकारानुसार प्रारुप नमुना जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदाना प्राप्त झाल्याने त्यांचे प्रारुप नमुन्यानुसार घट ते घर वर्गीकृत कचरा संकलन करणे आदि बाबींचा समावेश आहे.
नवीन ठेकेदाराकडून सफाई कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे. तशा सूचना ठेकेदारास देण्यात आलेल्या आहेत, असेही नगराध्यक्षा यांनी सांगितले. परंतु नवीन निविदा प्रक्रियेत मासिक बिल रुपये ३३,८९,४२१ जरी दिसत असले तरी कामानुसार खत प्रक्रिया करणे कामाचे रुपये ६ लाख ४९ हजार ५०० व वाहन परतावा रुपये २,०६,४०० हे वजा जाता सदर ठेका २५,६३,५२१ इतक रक्कमच होत असून त्या रकमेत देखील ठेकेदार जितके दैनंदिनरित्या करेल तितकेच बिल नवीन ठेकेदारास देण्यात येणार आहे.
शहरवासीयाच्या आरोग्या बाबत कुठलीही तडजोड करण्यात येणार नाही. तरी आरोप करणाऱ्यांनी विनाकारण अफवा पसरवु नये.