Bjp : कोरोना महामारीवर उपाययोजना करण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ; श्रीरामपूर भाजपाचा आरोप

श्रीरामपूर : भाजपचे शहर संघटन सरचिटणीस सतीश सौदागर, विशाल अंभोरे यांनी नायब तहसीलदार गुंजाळ यांना निवेदन दिले.
____________________________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मे 2020
श्रीरामपूर | कोविड १९ महामारीवर उपाययोजना करण्यात आणि प्रशासकीय गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यात महाराष्ट्र सरकार पुर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारच्या अकार्यक्षम धोरणांमुळे राज्यातील कोरोनाचा विळखा आणि मृत्युंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्याने स्वत: कोणतीही आर्थिक मदत जाहीर केलेली नाही . केंद्र सरकारने केलेल्या मदतीवर आभार व्यक्त न करता फक्त टिका करण्यात हे सरकार धन्यता मानत आहे.  सरकारला लवकरात लवकर जाग यावी आणि तातडीने उपाययोजना कराव्यात यासाठी भाजपातर्फे महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येत आहे, असे निवेदन नायब तहसीलदार गुंजाळ यांना नुकतेच ( दि.19) देण्यात आले 

          हे आंदोलन शहर व तालुका यांच्या वतीने तालुकाध्यक्ष सुनिल वाणी व शहर अध्यक्ष किरण लुनिया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी  संघटन सरचिटणीस सतिश सौदागर , विशाल अंभोरे , बाळासाहेब आहिरे , विजय लांडे,  सुहास पंडित आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post