साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 मे, 2020
श्रीरामपूर | मुळा प्रवरा वीज संस्थेचे चेअरमन यांनी आपल्या पक्षातील मान वाढवण्यासाठी जो मुळा प्रवरा वीज संस्थेचा २५ लक्ष रुपयाचं धनादेश प्रधानमंत्री सहाय्यता कोषात जो दिला आहे, ते फक्त आपले पक्षात वजन वाढावे या हेतूने दिले, पण या पैशावर संस्थेचे ग्राहक, कामगार यांचा प्रथम अधिकार होता; तरी अजूनही वेळ गेलेली नाही मुळा प्रवरा वीज संस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी ग्राहक आणि कामगारांना मदत करावी, असे आवाहन अखिल भारतीय सेनेचे तालुकाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी केले आहे.
प्रसिद्धस दिलेल्या पत्रकात शेख यांनी म्हंटले आहे की, देशात आणि राज्यात कोरोनामुळे लॉक डाऊन आहे मुळा प्रवरेच्या कार्यक्षेत्रात आज परिस्थिती खूपच वाईट आहे. कामगार आणि ग्राहक एका वेळच्या अन्नासाठी व्याकुळ आहे, पण त्यांची चिंता नाकारता संस्थेचे चेअरमन यांनी पक्षात वजन वाढावे म्हणून मदत प्रधानमंत्री सहाय्यता कोष मध्ये केली. आम्ही पाच वर्षां पूर्वी मुळा प्रवरा वीज संस्थेच्या निवडणुकीच्या वेळी संस्था लवकरात लवकर चालू करायची असेल तर सर्वांनी एकत्र यावे बिनविरोध निवडून करावी म्हणून महाआघाडी बनवणारे कामगार व ग्राहकाचे कैवारी म्हणून घेणारे ते चेअरमन आणि संचालक गेले तरी कुठे स्वतःची मालमत्ता आहे असे काम मुळा प्रवरा वीज संस्थेचे चेअरमन आणि संचालक करत आहे, संस्थेच्या वतीने जी २५ लक्ष मदत केली त्या मदतीवर प्रथम संस्थेच्या ग्राहक आणि कामगारांचे अधिकार होते. तरी वेळ गेलेली नाही मुळा प्रवरा वीज संस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांनी अजूनही ग्राहक आणि कामगारांना मदत करावी असे, आवाहन अखिल भारतीय सेनेचे तालुकाध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी केले आहे.