साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 मे, 2020
श्रीरामपूर | कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून अनेक डॉक्टर पोलीस अधिकारी कर्मचारी नर्सेस आरोग्य अधिकारी हे प्रयत्नशील आहे पण सर्व सामान्य नागरिकांना कोरोना या रोगाविषयी माहिती पुरविण्याचे कार्य करणारा पत्रकार हा महत्त्वाचा दुवा ठरला आहे. शासनाचे आवाहन रोज वेगवेगळ्या राज्यातून कोरोना विषयक बातम्या प्रसारित करून नागरिकांना सावध करण्याचे खरे श्रेय हे पत्रकारांनाच आहे. म्हणून कोरोना विरुद्ध लढाईत डॉक्टर व सरकारी अधिकाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या पत्रकारांचा 1 मे महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून गुलाब पुष्प गुच्छ देऊन पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
लॉक डाऊन मध्ये पत्रकारांनी वृत्त संकलन न थांबविता जीव धोक्यात घालून जबाबदारी पार पाडली या काळात अनेक पत्रकारांना कोरोनाची लागनही झाली मात्र त्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांच्या कार्य चालूच ठेवले वृत्तपत्र काही काळ बंद होते अशाही परिस्थितीत सोशल मिडीयाचे माध्यमातून विनामूल्य वृत्त सेवा दिली पत्रकारांचा कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कामगार नेते नागेश सावंत, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, बी एम पवार,विकास डेंगळे, राजेंद्र नारायण, किशोर वाडीले प्रताप राठोर, प्रवीण जमदाडे, राहुल रणपिसे, सचिन झिंजुर्डे, दिनेश यादव, यशवंत जेठे, आनंद पाटील, राज मोहम्मद शेख आदींनी वैयक्तिक अंतर ठेवून पत्रकारांचे सत्कार केले.