Shrirampur : नगरपरिषद हद्दीतील गाळ्यांची भाडेपट्टी व डेलिमार्केट शुल्क माफ करा ; काँग्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे यांची मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 मे 2020
श्रीरामपूर | सध्या करोना आजारांमुळे गेल्या दोन महिन्यांपासून  संचारबंदी लागू असून जनजीवन ठप्प असून व्यवहार पूर्णपणे बंद आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यवसायिक अडीचत सापडले असल्याने श्रीरामपूर नगरपरिषदेणे व्यवसायिक गाळ्यांची भाडेपट्टी माफ करुन डेली मार्केटचे शुल्क आकारणी थांबवावी, आशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे यांनी निवेदन देऊन केली आहे.

              कोरोनामुळे हातावर पोट भरणारे आणि रोज छोटा मोठा व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह करणारा व्यापारीवर्ग अडचणीत सापडला आहे आश्या संकटाच्या काळात श्रीरामपूर नगरपरिषदेने सर्वसामान्य व्यवसायिकांना मदतीची भूमिका घेऊन गाळ्यांची भाडेपट्टी माफ करुन डेली मार्केटची  चालू असलेली वसुली त्वरित थांबविण्याची मागणी छल्लारे  यांनी नगरपरिषद प्रशासनानाकडे केली आहे.

             केंद्र सरकार आणि राज्य सरकारने  देखील छोट्या व्यवसायिकांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. खाजगी मालकांनी भाडेकरूंना भाडे आकारणीमध्ये सवलत देण्याबाबत निर्णय झाला आहे.

              यापूर्वी श्रीरामपूर नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी घरपट्टी व भाडे पट्टीत सवलत देण्याची मागणी नगरपरिषदेकडे केली असल्याचे छल्लारे यांनी सांगितले आहे. त्यामुळे श्रीरामपूर नगरपरिषदेने त्वरित सकारात्मक निर्णय घेऊन छोटे व्यवसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी  मागणी केली आहे.  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post