Nevasa : वाढदिवसानिमित्त नामदार गडाखांनी केलेले रक्तदानाच काम राज्याला हेवा वाटेल असे ; घोलप

पानेगाव (ता.नेवासे) : महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले. यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, पानेगाव सरपंच संजय जंगले मुळाथडी पाणी आरक्षण समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप किशोर जंगले सी,आर जंगले आदी मान्यवर. (छाया-बाळासाहेब नवगिरे)
_______________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 29 मे 2020
पानेगाव (वार्ताहर) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दिवसरात्र काम करत आहेत. भविष्यात कोरोनाग्रस्त रुग्णांना रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून  त्यांच्या मंत्रिमंडळातील मृद व जलसंधारण मंत्री व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंकरराव यशवंतराव गडाख पाटील यांनी  सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त केलेले रक्तदानाचे पुण्याचे काम हे निश्चितच राज्याला हेवा वाटेल असे, असल्याचे प्रतिपादन मुळाथडी पाणी आरक्षण समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप यांनी (पानेगाव ता.नेवासे) केले.  येथील महादेव मंदिराच्या सभागृहात आयोजित रक्तदान शिबीर प्रसंगी ते  बोलत होते. यावेळी मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, पानेगाव सरपंच संजय जंगले, सुरेश प्रल्हाद जंगले, डॉ, गुडधे, परमानंद जाधव आदी उपस्थित होते. 


            तालुक्यात १९ ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित केले असून सकाळी आठ वाजल्यापासून रक्तदानाला सुरुवात झाली. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर युवक, युवतींने सहभाग नोंदवून चांगला प्रतिसाद दिला. नामदार शंकरराव गडाख यांचे काम नेहमीच कष्टकरी शेतकरी यांच्यासाठी धडपड असतात.  त्यांनी पाटपाणी शेतीमालाला भावा शेतकरी कर्जमाफी संदर्भात वेळोवेळी आंदोलने करुन निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ते नेहमी तप्तर आसुन यामुळे आनेक शेतकऱ्यांना फायदा झाला असल्याचे अंमळनेर संस्थेचे संचालक पंढरीनाथ घावटे, पानेगाव संस्थेचे अध्यक्ष जालिंदर जंगले, शिरेगाव संस्थेचे अध्यक्ष डॉ. रमेश जाधव, लक्ष्मीबाई संस्थेचे मार्गदर्शक अँड पांडुरंग माकोणे, नाथकृपा संस्थेचे मार्गदर्शक कर्णासाहेब औटी, प्रगत संस्थेचे अध्यक्ष आप्पासाहेब जाधव, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त कैलास जाधव यांनी सांगितले. 


       यावेळी करजगाव संस्थेचे संचालक चंद्रकांत टेमक, राजेंद्र टेमक, बाबासाहेब धात्रक, अच्युत घावटे, प्रभाकर माकोणे, डॉ जयवंतराव गुडधे,भाऊसाहेब काकडे, वाटापूर माजी सरपंच भिकाजी जगताप, अशोक गागरे सी आर जंगले, बबनराव जंगले, रमेश जंगले, बद्रीनाथ जंगले,सुभाष गुडधे डॉ तुवर शिवप्रहार संघटनेचे नेवासे तालुकाध्यक्ष किशोर जंगले यांनी म्हटले की, गटतट विसरून अशा समाजसेवी कामासाठी नेहमी कट्टीबद्ध असून  नामदार शंकरराव गडाख यांच्या कार्यला शुभेच्छा दिल्या. करजगाव येथेही रक्तदान शिबिरात मोठा प्रतिसाद मिळाला.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post