साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 मे 2020
नेवासा (दादा दरंदले) नेवासा पंचायत समिती नेवासा येथील प्रांगणात 20 ते 25 वर्षांपूर्वी नेवासा तालुक्याचे वैभव स्वातंत्र सैनिक यांचे स्मृतीस्तंभ उभारण्यात आलेला होता, सदर च्या स्तंभाचे तडे गेलेले होते, सदरचे स्तंभ हे तालुक्याचे वैभव असून सदर स्तंभची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत रावसाहेब कागुणे सभापती यांनी मांडले व नामदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या सर्व सन्मानीय सदस्यांनी यास एकमताने दुजोरा दिला व सभागृहात 125000 रुपयांची तरतूद करून कामकाज सुरुवात करण्यास परवानगी दिली त्यानंतर मा जिल्हाधिकारी यांचे मान्यता प्राप्त करून घेतली आहे.
सदर स्वतंत्र सैनिक यांचे स्मूती स्तभाचे सभापती रावसाहेब कागुणे यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले सदर कार्यक्रमास उपसभापती किशोर जोजार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. गट विकास अधिकारी शेखर शेलार पंचायत समिती सदस्य बाळासाहेब सोनवणे उप अभियंता अधिकारी संजय घुले, स्वातंत्र्य प्रतिनिधी सुनील शूळ, प्रमोद देशपांडे, व शेख यावेळी उपस्थित होते.