![]() |
| शनिशिंगणापुर येथे शनिजयंती निमित्त महंत त्रिबंक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. |
शनिशिंगणापूर (दादा दरंदले) शनी मंदिराच्या इतिहासात प्रथमच शनी भक्ताविना शनी जयंती महोत्सव साजरा करण्यात आला . देशातील सर्व धार्मिक स्थळ बंद करण्याच्या निर्णय सरकारने घेतला असून त्याप्रमाणे दि.१७ मार्च 2020 पासून शनी मंदिर दर्शनासाठी बंद केलेले आहे.
शनी जयंतीला शिंगणापूर येथे मोठा उसत्व साजरा करण्याचा इतिहास आहे . काशी येथून सायकलवर पाणी आणले जाते तसेच गावातील तरुण प्रवरसंगम येथून पायी चालत पाणी आणून मिरवणूक व मोठा जलअभिषेक केला जात होता. यावर्षी पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगाजलने स्वयंभू शनिमुर्तीला स्नान घालण्यात आले.उदासी महाराज मठात अभिषेक करुन दुपारी बारा वाजता त्रिंबक महाराज यांच्या हस्ते आरती सोहळा झाला. मंदिर आणि दर्शन बंद असल्याने अनेकांनी देवस्थानच्या सोशल साइटवर जाऊन महापुजा व आरती सोहळा बघितला.
मंदिरात काही निवडक कर्मचारी व अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शनी जन्म उत्सव साजरा करण्यात आला . दुपारच्या आरतीच्या वेळेस काही विश्वस्त मंदिरात उपस्थित होते तर काही आजी-माजी विश्वस्त,संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थांना पोलीस अधिकाऱ्याने गेटवर अडविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता .मात्र कोरोना संसर्गाचे गांभीर्य म्हणून पोलिसांनी कुणालाच आत सोडले नाही.
