Shrirampur : श्रीरामपूर मतदार संघातील विज पुरवठा सुरळीत करा; करण ससाणेंची नामदार तनपुरे यांच्याकडे मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 मे 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील विज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी युवा नेते तथा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी ऊर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे यावेळी आमदार लहू कानडे उपस्थित होते.

         कोरोना संदर्भात नामदार तनपुरे यांनी श्रीरामपूर येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर यांनी मतदारसंघातील  विजेच्या गंभीर प्रश्नाबाबत चर्चा उपस्थित करुन मंत्री मोहदयांचे लक्ष वेधले आहे.आणि निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मतदार संघात अनेक सबस्टेशन वरील फिडर ओहरलोड झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सक्तीच्या लोडशेडिंगला सामोरे जावे लागत असल्याने मतदार संघातील शेतकरी अडचणीत सापडला आहे.

            एकीकडे विहिरी भरल्या आहेत तर दुसरीकडे मिळणाऱ्या आठ तासाच्या विजपुरवठ्यात दिड तास सक्तीचे भारनियमन केल्याने  पहिलेच कोरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढं शेतातील पिकं पाण्याअभावी जळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे त्यामुळे भरनियमांच्या वेळेत बदल करुन दिवसा लाईट देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच श्रीरामपूरकरीता मंजूर असलेले उच्चदाब सबस्टेशन बाबतदेखील शासन दरबारी त्वरित निर्णय करुन सदरचे सबस्टेशन लवकरात लवकर उभे करण्याची मागणी केली आहे. ओहरलोड असलेल्या फिडरवर  वीज विभागणी करुन यावर उपाय योजना करण्यात येऊन नव्याने सबस्टेशन उभारुन  नादुरुस्त असलेले रोहित्र त्वरित दुरुस्त करुन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. यावर नामदार तनपुरे यांनी लगेचच महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन याबाबतच्या अडचणींचा कृती आराखडा करुन त्वरित उपाय योजना करण्याचे आदेश दिले आहे.

            निवेदनावर माजी नगराध्यक्ष संजय फड, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मुरकुटे, बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, नगरसेवक दिलीप नागरे, मनोज लबडे, आशिष धनवटे, रितेश रोटे पाटील,मुन्ना पठाण आदींच्या सह्या आहेत.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post