बेलापूर (प्रतिनिधी ) कोरोनोमुळे लांबणीवर पडलेला विवाह सोहळा काही मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत घरातच संपन्न झाला.
वधु वर यांनी सोशल डिस्टनचे नियम पाळत एकमेकाना आयुष्यभर सांथ देण्याची शपथ घेतली.
बेलापूर येथील रहीवासी रामेश प्रभाकर जगदाळे यांची मुलगी मयुरी हीचा विवाह निमगाव कोर्हाळे तालुका राहाता येथील पोपट दामोधर साळवे हल्ली राहाणार चांदेगाव तालुका राहुरी यांचेशी ठराला होता.
विवाहाच्या पत्रीका देखील छापुन झाल्या होत्या. पत्रिका वाटणार तोच कोरोनाचे संकट आले अन विवाह स्थगित करावा लागला. कोरोनामुळे लाँकडाऊन वाढतच चालल्यामुळे अखेर दोन्ही कुटुंबानी विवाह करण्याचे ठरविले. विवाह करीता कशी परवानगी मिळेल याची माहीती घेतली. अन सोशल डिस्टनचा नियम पाळून मोजक्याच पाहुण्याच्या उपस्थितीत विवाह सोहळा उरकण्याचे दोन्ही कुटुंबांना सुचविण्यात आले. त्या प्रामाणे दोन्ही कुटुंबानी एका घरातच हा विवाह सोहळा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.
मुला मुलीचे आई वडील व इतर असे एकूण दहा जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. वधु वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी मुला मुलीचे आई वडील दोन्ही मामा तसेच बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, उपसरपंच रविंद्र खटोड पत्रकार देविदास देसाई, विजय शेलार, किरण शेलार, सुहास शेलार आदि उपस्थित होते.