नेवासा (दादा दरंदले) नेवासे पंचायत समिती अंतर्गत राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी 75 हजार रुपये रकमेचा धनादेशाचे वितरण करण्यात आले.
इयत्ता पहिली ते बारावी वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास केंद्र शासनाने राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंतर्गत त्रिमूर्ती विद्यालय खडका व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सलाबतपुर येथील विद्यार्थी पालकांना धनादेशाचे वितरण पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी पंचायत समिती अंतर्गत सर्वच योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याबाबत सभापती कांगुणे यांनी समाधान व्यक्त केले.
त्यावेळी पंचायत समिती सदस्य विक्रम चौधरी संजय खरे बाळासाहेब सोनवणे गटविकास अधिकारी शेखर शेलार गटशिक्षणाधिकारी हेमलता गलांडे अपंग विभागाचे मदन लाड सचिन बेळगे समी शेख आदी उपस्थित होते