साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 मे 2020
श्रीरामपूर | भविष्यकाळात कोरोनाला सोबत घेऊनच जगावे लागणार आहे त्याची सुरुवात आतापासूनच करणे गरजेचे आहे. जे नियमाचे उल्लंघन करतील त्यांना कडक शासन करा. काही दुकानदारांनी सामाजिक अंतर ठेवले नाही, नियम पाळले नाही म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी नवीन स्वतंत्र आदेश काढून सुरू झालेले दुकाने बंद केली. यामुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली. छोट्या व्यापाऱ्यांच्या भावनांशी खेळू नका. शहरातील संचारबंदी, जमावबंदी अधिक कडक करून बंद झालेली बाजारपेठ त्वरित सुरू करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारप्रमुख तिलक डुंगरवाल यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.
याबाबत डुंगरवाल यांनी म्हंटले आहे की, शहरातील व तालुक्यातील सर्वधर्म नागरिकांचे विविध धार्मिक उत्सव सण कोरोनामुळे होऊ शकले नाहीत. सर्वत्र कडेकोट बंदोबस्त व वेळेचे बंधन असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वस्तूंची काळ्या बाजाराने दहापटीने विक्री करण्यात आली. अव्वाच्या सव्वा दर आकारून सामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली. प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी जास्त दर घेणाऱ्या विरुद्ध कारवाईचे संकेत दिले.
यापूर्वी ग्रामीण भागातील एका मूकबधिर व्यक्तीला तो बाहेरून आल्याने कोरोनाची लागण झाली त्याचा पुणे येथे सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला ; त्यामुळे शहरासह तालुक्यात सरकारी यंत्रणेने चोकपणे कामगिरी बजावून पोलीस महसूल आरोग्य विभागाला दक्षतेचे आदेश दिले. सत्ताधारी पक्षाने सर्व विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन बाजारपेठ सुरु करणे बाबत व्यापाऱ्यांशी चर्चा केली. व्यापाऱ्यांनी बाजारपेठ चालू करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्रस्ताव दिला. मुख्याधिकार्यांनी दोन दिवसापूर्वी व्यापार्यांना नियमाचे पालन करून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. अनेक व्यापाऱ्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या पैशातून मोठ्या प्रमाणात माल खरेदी केला लाँक डाऊन हळूहळू कमी होईल त्यानंतर व्यापार वाढेल या आशेवर मात्र त्यांचा भ्रमनिरास झाला. काही दुकानदारांनी सामाजिक अंतर ठेवले नाही नियम पाळले नाही म्हणून महसूल अधिकाऱ्यांनी नवीन स्वतंत्र आदेश काढून सुरू झालेले दुकाने बंद केली. यामुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली.
कोरोनाचे संकटआधिक काळ राहणार आहे असे मत जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे कोरोनाच्या धास्तीने मग बाजारपेठ सुरू करायची नाही का?? काही व्यापाऱ्यांनी नियमाचे पालन केले नाही म्हणून त्यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई न करता प्रामाणिकपणे नियम पाळणाऱ्या व्यापार्यांना त्याची सजा का द्यावी, असा सवाल डुंगरवाल यांनी उपस्थित केला आहे.
भविष्यकाळात कोरोनाला सोबत घेऊनच जगावे लागणार आहे त्याची सुरुवात आतापासूनच करा जो नियमाचे उल्लंघन करील त्यांना शासन झाले पाहिजे. शहरासह तालुक्यात संचारबंदी, जमावबंदी अधिक कडक करून शरीरातील वेगवेगळ्या ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून प्रमुख मार्गावर लावण्यात आलेले बॅरिकेट्स अचानकपणे काढून टाकण्यात आले. यामुळे वेगळे परिसरातून टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्यांचा सर्रास वापर होत असल्याने पुन्हा बॅरिकेट लावून शहरातील संचारबंदी जमावबंदी अधिक कडक करून बंद झालेली बाजारपेठ त्वरित सुरू करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारप्रमुख तिलक डुंगरवाल यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हा अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.