साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 मे 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु. ग्रामपंचायत हद्दीतील बेलापूर-पढेगाव रस्त्यालगतच्या शिक्षक कॉलनी परिसरातील नागरी समस्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. या भागातील रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबले आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. गटारी तुंबलेल्या आहेत.
याठिकाणी काही दिवसांपूर्वी जेसिपीने पक्के रस्ते फोडून गटार काढण्याचा फाजिल प्रकार ग्रामपंचायतीने केला ; खड्डयांतून पाणी वाहिले तर नाही पण तुंबले. त्यामुळे तुंबलेल्या घाण पाण्यात डासांचा उपद्रव वाढला आहे.