साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 मे 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) लाँकडाऊन काळात दुकान सुरु केल्याचा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने विचारताच दुकानदाराने संबधीत कर्मचाऱ्यांला शिवीगाळ केल्यामुळे बेलापूरात दिवसभर कोरोनाची नाही तर किराणाचीच चर्चा चालु होती.
बेलापूर ग्रामस्थांनी १७ तारखेपर्यत दिवसाआड दुकाने सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. १७ तारखेनंतर काय हे ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी ठरविणे गरजेचे होते ; परंतु तसा काही निर्णय न झाल्यामुळे किराणा दुकानदारांनी नेहमी प्रमाणे दुकाने सुरु केली. किराणा दुकान सुरु झाल्याचे समजताच ग्रामपंचायत कर्मचारी खरोटे हे त्या ठिकाणी गेले व दंडाची पावती फाडली यावरुन दुकानदाराने कर्मचाऱ्यांस अरेरावी केली. यावरुन काही काळ वातावरण संतप्त झाले होते.
व्यापाऱ्यांनी या बाबत तातडीने बैठक घेवुन पुढील निर्णय व्यापाऱ्यांना कळविणे आवश्यक असताना तसे केले नाही. हा दोष आपला नाही आपल्याला मा जिल्हाधिकारी यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी दिलेली आहे त्यामुळे सर्वानुमते तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे बैठकीत ठरले. त्याप्रमाणे सर्व व्यापारी तहसीलदार प्रशांत पाटील व प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याकडे गेले. बेलापूर ग्रामपंचायतीनेही तातडीने व्यापारी व ग्रामस्थ यांची एकत्रीत बैठक बोलविली. या बैठकीत व्यापाऱ्यांना काही नियम घालुन दिले नियमाचा भंग करणारावर कायदेशीर कारवाई करण्याचेही बैठकीत ठरले. छोट्या व्यवसायीकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने या बैठकीत निर्णय घेण्यात आला व्यापाऱ्यांनी दुकानात गर्दी होणार नाही यांची दक्षता घ्यावयाची आहे. सोशल डिस्टनींगच्या नियमाचे काटेकोर पालन करुन प्रत्येक व्यापाऱ्यांनी सँनिटायझर ठेवावे ठरवुन दिलेल्या वेळेतच दुकाने उघडी ठेवावी
रविवार हा दिवस जनता कर्फ्यु म्हणून पाळण्यात यावा. या नियमाचा भंग करणार्यावर कायदेशीर कारवाई करावी. यात कुणीही राजकारण आणू नये असे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. अन काही तासातच बेलापूर गावची बाजारपेठ गर्दीने खुलली खरेदीदार व विक्रेते याची बाजारपेठेत गर्दी दिसु लागली या निमित्ताने बाहेर गावातील काही व्यापारीही माल विकण्यासाठी गावात येवु लागले असुन एखादा बाधीत व्यक्ती गावात आल्यास त्यास जबाबदार कोण असाही प्रश्न काही नागरीकांनी उपस्थित केला ग्रामपंचायत कर्मचार्यास शिवीगाळ करणार्या व्यापार्याने दिलगीरी व्यक्त केल्यामुळे तसेच विनापरवाना दुकान उघडल्यामुळे दंडात्मक कारवाई करुन त्या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला, असे असले तरी बेलापुर गावात दिवसभर कोरोनाची नव्हे तर किराणाचीच चर्चा होती.