श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील मेमन समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शरीफ मेमन यांचा चिरंजीव अर्षद (वय ११ वर्ष) याने पवित्र रमजान महिन्याचे महिनाभराचे उपवास (रोजे) पूर्ण केले.यावर्षी रमजान महिना तीव्र उन्हाळ्यामध्ये आलेला असून या उन्हाच्या तीव्रतेत सुद्धा अर्षद याने महिनाभर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काहीही न खाता-पिता हे रोजे पूर्ण केले . तो येथील न्यू इंग्लीश स्कूल चा इयता ६ वीचा विद्यार्थी आहे. त्याच्या या धाडसाबद्दल समाजाच्या सर्व थरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.