साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 मे 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) कोरोनाला आटोक्यात आणण्यास शासनाला अपयश आले असुन या घटनेबाबत लक्षवेधण्यासाठी बेलापूर भाजपाच्या वतीने महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्यात आले.
राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे.राज्यातील कोरोना फायटर्स असलेल पोलिस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी याच्या आरोग्याची काळजी घेण्यासही हे सरकार अपयशी ठरले आहे.
राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी बेलापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा उत्तर नगर‘ च्या वतीने 'महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन केले.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या अंगणात राज्य सरकारचे फेल्युअर फलक हातात घेऊन, तोंडावर काळे मास्क लावुन, अपयशी राज्य सरकारचा निषेध नोंदवला.