Belapur : बेलापूरात गोरगरिबांसाठी लुक्कड परिवारासह अनेकांचे हात पुढे ; गरिबांसाठी मोफत अन्नछत्र सुरु


साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 एप्रिल 2020
बेलापूर  | उक्कलगाव | प्रतिनिधी |कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र लोकडाऊन चालू आहे. त्यामुळे गरिबांचे जगणे अवघड झाले आहे. याकाळात पोटाची खळगी भरण्यासाठी गोरगरिबांची  अन्नान्न दशा झाली. गरिबांचे हेच दुःख ओळखून लुक्कड परिवाराने स्वःखर्चातुन सुरु केलेल्या मोफत अन्नछत्रास मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावले. बेलापूरात  लुक्कड परिवाराबरोबरच माहेश्वरी समाज तसेच अकबर टिन मेकरवाले गोरगरिबांसाठी देवदूत ठरत आहेत. 

                 कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले. या लाॅकडाउनमुळे दररोज कमाई करुन आपला चरितार्थ चालविणार्याची दररोजच्या खाण्यापिण्याची पंचायत झाली. हे लक्षात घेवुन सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असणारे सुवालाल लुक्कड व लुक्कड परिवाराने अन्नछत्र चालु करण्याचा मनोदय व्यक्त केला. बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी तातडीने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला त्यांनी देखील परिस्थीतीत लक्षात घेता नियमांचे काटेकोर पालन करुन अन्नछत्र सुरु करण्यास अनुमती दिली अन बेलापूर गावात गोरगरीबासाठी सुरु झाले मोफत अन्नछत्र.  

पक्षांसाठीही अन्नाची व्यवस्था करण्यात आली आहे. 

           लुक्कड परिवाराने स्वःखर्चातुन सुरु केलेल्या मोफत अन्नछत्रास मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावले. काहींनी वस्तू स्वरुपात तर काहींनी रोख स्वरुपात मदत केली. काही कार्यकर्त्यानी सामाजिक वारसा जपत या कार्यात स्वतःला वाहुन घेतले अन् अनेक गोरगरीबांना मोठा आधार झाला एक वेळच्या अन्नाची चिंता मिटली लाॅक डाऊन मुळे पशुपक्षाचेही हाल होत असल्याचे काही कार्यकर्त्यानी सुवालाल लुंक्कड यांच्या निदर्शनास आणुन दिले मग काय पक्षासाठीही अन्नाची व्यवस्था करण्यात आली. लुक्कड परिवाराने सुरु केलेले अन्नछत्र केवळ सकाळीच सुरु असते. त्यामुळे अनेक जण सायंकाळचे देखील पार्सल घरी नेत होते. या नागरीकांची सायंकाळची सोय होणे गरजेचे आहे हे लक्षात घेवुन माहेश्वरी समाजही देखील पुढे सरसावला आहे. त्यांनी देखील संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था केली. गरमपोळ्या भाजी पिशवीत पॅक करुन त्याचे वाटप सुरु करण्यात सुरूवात केली. या अन्नछत्रास देखील मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावत आहे. मदत देणारे आपापल्या परीने गहु , भाजीपाला व रोख रकमेच्या स्वरुपात मदत करत आहे. यात मुस्लीम समाजही मागे राहीलेला नाही, मुस्लीम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अकबर टिन मेकरवाले यांनी आपल्या घरीच जेवण तयार करुन घर पोहोच करण्याचा निर्णय घेतला. अकबर व त्यांचे कुटुंबीय,मित्र परिवार दिवसा गरीब कुटुंबाच्या घरी जावुन घरी किती माणसे आहेत याची आस्थेने विचारपुस करुन सांयकाळचे आपले सर्वाचे जेवण आम्ही पोहोच करतो असे सांगुन सायंकाळी त्या कुटुंबांना न चुकता जेवण पोहोच करतात कोरोनाच्या धास्तीने सर्व प्रार्थनास्थळाचे दरवाजे बंद आहेत. परंतु अन्नछत्र ते ही मोफत चालविणार्या या देवदुतामुळे अनेकांना आपल्या मदतीला देवच धावुन आल्याची अनुभती होत आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post