साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मे 2020
घोडेगाव (दादा दरंदले) नेवासा तालुक्यातून अहमदनगर येथे कोरोना तपासणीसाठी नेलेला रुग्ण अहमदनगर येथून काही दिवसांपूर्वी पसार झाला होता.
पसार झालेल्या रुग्णाची माहिती नेवासा प्रशासनाला कळविल्याच्या नंतर त्याची शोधाशोध सुरू झाली होती. आज मंगळवार (दि.२६) रोजी रुग्ण घोडेगाव येथे आल्याची माहिती प्रशासनास मिळाली व घोडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.मनीष ईशवरे यांनी त्या ठिकाणी जाऊन वरिष्ठांना त्वरित माहिती देऊन कळविले असता नेवासा तहसीलदार श्री रुपेश सुराणा साहेब आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सूर्यवंशी डॉ सोमनाथ यादव यांनी पुढील कारवाई करत रुग्णालाला ताब्यात घेतले असून त्याला नियोजित क्वॉरंटाइन सेंटरला क्वॉरंटाइन केले आहे त्या कामी सोनई पोलीस स्टेशन चे स.पो.नि.जनार्दन सोनवणे पो.हे.कॉ.विठ्ठल थोरात, बाबा वाघमोडे, किरण गायकवाड यांचे मोठे सहकार्य लाभले.