Belapur : पोहण्यास गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू

साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 मे 2020
बेलापूर  ( प्रतिनिधी ) पोहण्यास गेलेला 10 वर्षे 
वयाच्या मुलाचा आज ( दि.12)  बेलापूर पढेगाव रस्त्यावर असणाऱ्या  खटकाळी गावठाण येथील खाणीत असलेल्या पाण्यात बुडून मृत्यू  झाला  असुन या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  

                    याबाबत समजलेली हाकीकत अशी  की,  खटकाळी गावठाण येथील आदित्य विकास जगताप वय वर्ष १० हा मित्रा समवेत दुपारी २ .३० वाजेच्या सुमारास पोहोण्यास गेला होता. पोहत असताना दम तुटल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला ही घटना परिसरात समजताच सुनिल खरात दादु जागताप बाळू जगताप सुमीत ऋषीकेश जींतेंद्र यांनी पाण्यात शोध घेतला अखेर सायंकाळी 6 वाजता त्याचा मृतदेह  सापडला. पोलीस नाईक ढोकणे पोपट भोईटे  यांनी त्यास दवाखान्यात  हलविले. तेथे वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास मृत घोषीत केले. त्याच्या पश्चात 1 भाऊ, 3 बहीणी, आई आहेत.  या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post