साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 मे 2020
नेवासा (दादा दरंदले) राज्यात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले होते. या आवाहनास प्रतिसाद देत नेवासा तालुक्यात मृद व जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासा तालुक्यातील शंकरराव गडाख मित्र मंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबिरात नेवाशातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
![]() |
रक्तदान शिबिरास महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग मिळाला. |
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी पुढील काळात रक्ताचा तुटवडा होऊ नये, याकरता नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले होते. आवाहानाला प्रतिसाद देत नेवासा तालुका शंकरराव गडाख मित्र मंडळ यांनी मंत्री शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त फेटे हार तुरे इतरत्र अनावश्यक गोष्टींना फाटा देत महारक्तदान शिबीर आयोजित केले नेवासा तालुक्यातील 19 ठिकाणी हे रक्तदान शिबिर घेण्यात आले सामाजिक बांधिलकी जोपासत, सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत हे रक्तदान शिबिर पार पडले यात 2 हजार 553 नागरिकांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
तालुक्यातील घोडेगाव,चांदा,माका,वडाळा, करजगाव,खरवडी,सलाबतपुर,बेळपिंपळगाव,प्रवरासंगम,भानसहिवरे,पाचेगाव,भेंडा,मुकिंदपूर,कुकाणा,वरखेड,नेवासाखुर्द,गेवराई,सोनई,पानेगाव,शनिशिंगणापूर आदी ठिकाणी रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.उदयन गडाख यांनी सोनई येथे रक्तदान करून तालुक्यात रक्तदान शिबिर सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या. शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या रक्तदात्यांची थर्मल स्क्रीनिंग आणि निर्जनतुकीकरन करून आत प्रवेश देण्यात आला.तसेच काही महाविद्यालयीन तरुणीनीही या रक्तदान शिबिरात रक्तदान करत महीलांचा रक्तदानाचा पायंडा पाडला.