साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 मे 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहरातील गोंधवणी रस्त्यालगत पाटाच्या पुलाखालील साचलेल्या घाण पाण्यामध्ये काही दिवसांपूर्वी रात्री अंधाराचा फायदा घेत मेलेली जनावरे (कुत्रे - शेळ्या,मेंढी) टाकल्याने ते पाण्यात पूर्णत: सडून परीसरात दुर्गंधी पसरली आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना नाक दाबून रस्त्याने मार्गक्रमण करावे लागत आहे.

या प्रकरणी संबंधितांकडे आठ दिवसांपासून तक्रार करूनही अद्यापपर्यंत कोणतीही दखल घेतली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. परीसरातील नागरीकांना या दुर्गधीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी याप्रकरणी लक्ष घालून जनतेचा त्रास दूर करावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
आधीच कोरोनाच्या संकटाने नागरीकांच्या नाकी नऊ आणले असताना सदरील दुर्गंधीपासून साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये अशी भीती नागरीकांच्या मनात निर्माण होत आहे. मात्र, तरी देखील श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनातील संबंधित विभागाचे अधिकारी/कर्मचार्यांत अशा गंभीरबाबी कमालीची उदासिनता दिसून येत असल्याने नागरीकांना मोठ्या आवघड समस्यांचा सामना करणे भाग पडत आहे. नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक आणि मुख्याधिकारी समीर शेख यांनी याप्रकरणी स्वत: लक्ष घालून परीसरातील नागरीकांना या दुर्गंधीपासून मुक्ती देत त्यांचा त्रास दूर करावा अशी, मागणी परीसरातील त्रस्त नागरीकांकडून होत आहे.