साईकिरण टाइम्स ब्युरो, 25 मे 2020
नेवासा | प्रतिनिधी | खडका नेवासा रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ भरधाव मोटार कारच्या धडकेत एकाचा जागीच मृत्य झाला. रविवारी (दि 24) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की रविवार दि.24 रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास खडका फाट्यावरून नेवासा कडे येणाऱ्या मारुती स्विफ्ट कार गाडीने (क्रमांक MH 17 AZ 4699) पायी चालणाऱ्या जगन्नाथ गंगाधर पवार (वय 65 वर्षे ) राहणार नेवासा खुर्द यांना चिरडून गाडी दिशा दर्शक फलकाला आदळून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या काटवणात शिरली. यात जगन्नाथ गंगाधर पवार जागीच ठार झाले .
शेवंगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जावळे, पोलीस निरीक्षक रणजीत डेरे, पो.ह.तुळशीराम गिते यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृत देह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला आहे. वाहन चालकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.