उक्कलगाव | प्रतिनिधी | मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकण वस्ती शाळेतील इयत्ता चौथीचा विद्यार्थी चि सार्थक सुभाष थोरात याने घवघवीत यश मिळविले असून त्याला शाळेचे शिक्षक सोमनाथ अनाप,प्रशांत बोरूडे, वडील सुभाष थोरात, आई अश्विनी थोरात यांचे मार्गदर्शन लाभले.
या परिक्षेत सार्थक थोरात याने मराठी व गणित, इग्रंजी,सामान्यज्ञान या एकुण विषयात २५८ गुण मिळवित अनुक्रमे तालुक्यात तो द्वितीय, जिल्ह्यात विसावा,राज्यात बाविसावा क्रमांक मिळवला. सार्थकने मिळवलेल्या यशाचे गावचे संरपच, उपसरपंच,सर्व सदस्य,मंडळानी त्याचे अभिनंदन केले असून हरिहर एकता आघाडीचे अध्यक्ष व मार्गदर्शक रामचंद्र गंगाधर थोरात यांचा तो नातू आहे यांसह त्यांचे सर्वत्र स्तरातून कौतुक आहे.
Tags
शैक्षणिक