ACB: लिपिकास लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले ; शासकीय कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले

साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 मे 2020
श्रीरामपूर नकाशाच्या प्रती  देण्याकरिता तक्रारदारकडून  500 रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी राहुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक 
विभागाच्या पथकाने आज (दि. 26) रंगेहाथ पकडले. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.  


            याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांना त्यांचे शेतजमिनीचा  रस्ता कोर्टकेस करिता, त्यांना राहुरी खुर्द व बुद्रुक गावांच्या नकाशाच्या प्रती पाहिजे होत्या. या प्रती  देण्याकरिता राहुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक (वर्ग 3) अशिफ जैनुद्दिन शेख यांनी मंगळवारी  (दि 26)  आयोजित लाच मागणी पडताळणी  दरम्यान  पंचासमक्ष 500 रुपयाची मागणी करुन, सदरची रक्कम भूमी अभिलेख कार्यालय राहुरी येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडले आहे.

           अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक व सापळा अधिकारी दिपक करांडे ,सहायक अधिकारी श्याम पवरे, पर्यवेक्षण अधिकारी हरीष खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post