साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 मे 2020
श्रीरामपूर | कोविड 19 करोना विरोधात लढत असलेल्या लढाईत महाराष्ट्र सरकार सपशेल अपयशी ठरत आहे. देशात सगळयात जास्त करोना पेशंट असणारं राज्य महाराष्ट्र असल्याने करोना विरोधात उपाय योजना करण्यातही ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. या घटनेबाबत लक्ष वेधण्यासाठी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल वाणी, शहराध्यक्ष किरण लुणिया यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूरात 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात आले.
राज्यात करोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे. त्यामुळे आज देशभरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र सरकार विरोधात महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. श्रीरामपूरात भारतीय जनता पार्टीच्या वतीनेही आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन तालुका व शहर मिळून एकूण 134 बुथवर यशस्वीपणे करण्यात आले. ह्या आंदोलनाचे नेतृत्व तालुक्याचे अध्यक्ष सुनील वाणी व शहराध्यक्ष किरण लुनिया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. हे आंदोलन गर्दी न करता व रस्त्यावर न येता प्रत्येकांच्या आंगनात करण्यात आले, अशी माहिती भाजपाचे शहर संघटन सरचिटणीस सतिश सौदागर यांनी दिली.