दहावा घाटावरील वॉल कंपाऊंडच्या कामास स्थगिती घेण्याची मागणी

साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 मे 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) येथील दहावा घाटावरील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या वॉल कंपाऊंडच्या कामास स्थगिती घ्यावी अशी, मागणी अशोक  कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. 

      बेलापूर ग्रामपंचायत प्रशासनास दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की , बेलापूर बु.येथील दहावा घाटावरील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत वॉल कंपाऊंडचे काम चालू आहे.हे काम पूर्ण झाल्यास अनेक वर्षापासूनचा रहदारीचा रस्ता बंद होणार असून दहावा घाटावर येणाऱ्या बेलापूर बु. येथील तसेच परिसरातील नागरिकांची रस्त्याअभावी गैरसोय होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य ते उचित कायदेशीर पावले उचलून सदर वॉल कंपाऊंड बांधकामास स्थगिती घ्यावी, अशी मागणी श्री खंडागळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे .

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post