साईकिरण टाइम्स ब्युरो 24 मे 2020
नेवासा (दादा दरंदले) राज्याचे जलसंधारण मंत्री व नेवासा तालुक्याचे लोकप्रतिनिधी नामदार शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नाने उन्हाळी आवर्तन सोडल्याने नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
शेतकरी, पाणीदार आमदार अशी ओळख असणाऱ्या नामदार शंकरराव गडाख यांना धन्यवाद देतांना दिसत आहे.नामदार शंकरराव गडाख यांनी शेतकऱ्यांचा पाटपाणी व पाणीप्रश्न तातडीने सोडून उन्हाळी आवर्तन यशस्वी करुन वेळेवर पाणी दिल्याने पिकांना जीवदान मिळाले असून जनावरांना देखील ऐन उन्हाळ्यात प्यायला पाणी व चारा उपलब्ध झाले आहे.उन्हाळी आवर्तन सोडल्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधान कारक वातावरण असून ना. गडाख यांच्या योग्य नियोजन बद्ध कामामुळे मुळा धरणाचे पाटपाणी शेतकऱ्यांना वेळेवर मिळाल्याने व उन्हाळी आवर्तन यशस्वीकेल्याबद्दल ना.शंकरराव गडाख यांचे शेतकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.