साईकिरण टाइम्स ब्युरो 18 मे 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने दि. ५ मे ते १७ मे दरम्यान बेलापूर बु. व ऐनतपूर भागातील महिला व मुलिंसाठी भागवत प्रतिष्ठान,बेलापूर यांचे वतीने " कोरोना संदेशपर रांगोळी " हा विषय घेऊन आयोजित करण्यात आलेल्या एका अभिनव रांगोळी स्पर्धेचा निकाल दि.१८ मे रोजी घोषित करण्यात आला.
रांगोळीच्या माध्यमातून कोरोना विषयी जनजागृती व्हावी हा स्पर्धा भरविण्या मागचा हेतू असल्याचे , प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिषेक खंडागळे यांनी सांगितले . अनेक महिला व मुलिंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला . त्यामधून अनुक्रमे कु. सिद्धी नरेंद्र वर्मा ( रु.१००१ ), सौ. कविता किरण गंगवाल (रु.७०१), सो. मंजुश्री योगेश जाधव ( रु.५०१) या तीन स्पर्धकांना विजयी घोषित करण्यात आले.
लॉकडाऊन दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्यासाठी विजेत्यांना बक्षीसाची रक्कम अॉनलाईन ट्रान्सपर करण्यात येणार आहे. रांगोळी कलेमध्ये नाव लौकिक असलेल्या सौ. कलावती देशमुख , सौ. ज्योती कवडे व सौ. प्रज्ञा सातपुते यांनी स्पर्धेमध्ये परिक्षक म्हणून काम पाहीले.
या स्पर्धेमध्ये भाग घेऊन कोरोना सबंधी जनजागृतीच्या कामात हातभार लावणाऱ्या सर्व माता-भगिनींचे तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे संयोजकांनी आभार मानले.